Advertisement
बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बुधवारी बीडमध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते विविध बैठका घेणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मात्र त्यांच्या या दौऱ्याला धनंजय मुंडेंनी दांडी मारली.
उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यारम्यान नेमकं का अनुपस्थित आहोत याचं कारणही मुंडेंनीच दिलं आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रकृतीच्या कारणामुळे आपण या दौऱ्याला हजर राहू शकणार नाही अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडिवार केली. पक्षनेतृत्त्वाला आपण याबबात पूर्वसूचना दिल्याचंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. धनंजय मुंडे जरी दौऱ्याला उपस्थित राहणार नसले तरी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि अजित पवार मात्र या दौऱ्यादरम्यान एकाच मंचावर येणार आहेत. बीडधील जिल्हा प्रशासन बैठकीत ते एकत्र येणार आहेत. तसंच संध्याकाळी होणा-या एका कार्यक्रमातही हे दोन्ही नेते सोबत असणार आहेत. एकिकडे मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चा असतानाच दुसरीकडे दरम्यान बीडमध्ये दाखल होताच अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं. जिथं उपस्थित अधिका-यांना सूचना देत सर्व आवश्यक माहिती चार तासांत सादर करण्यास त्यांनी सांगितलं.