#

Advertisement

Wednesday, April 2, 2025, April 02, 2025 WIB
Last Updated 2025-04-02T11:56:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर, शरद पवार गटाची भूमिका ?

Advertisement

दिल्ली :  लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने संसदेत भाषण करत या मुद्द्यावर त्यांचे मत मांडले. यावेळी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी भाषण करत प्रतिक्रिया दिली.
खासदार निलेश लंके यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक एक समाज संपवला जाईल. सत्तेला नव्हे तर समाजाला मी उत्तरदाई आहे. या विधेयकातील तरतुदींना आम्ही विरोध करत आहोत, असे निलेश लंके म्हणाले. निलेश लंके यांनी मराठीत भाषण केले.या विधेयकामुळे अनेक अधिकार सरकारकडे जातील. 1.2 लाख कोटी रुपयांची जमीन सरकारकडे जाईल. वक्फ बोर्डाच्या अधिकारात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करावा, असे निलेश लंकेंनी म्हटले.
सायरस पूनावला, रतन टाटा हे पारशी समाजाचे आहेत, पण त्यांनी मोठं सामाजिक काम केलं. अजीम प्रेमजी, ए पी जे अब्दुल कलाम हे मुस्लिम समाजाचे आहे. मात्र त्यांनी मोठं काम केलं. आनंद ऋषी हे जैन समाजाचे मात्र त्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलं. 12 वर्ष एखाद्या जमिनीवर अतिक्रमण केलं, तर ती जमीन त्याची होईल. उद्या इतर समाजाच्या संस्थावर देखील हीच परिस्थिती येईल. भारत सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. आज आपण गप्प बसलो तर उद्यापासून एक एक समाज संपवला जाईल, असेही निलेश लंके म्हणाले. सत्तेला नव्हे तर समाजाला मी उत्तरदाई आहे. या विधेयकातील तरतुदींना आम्ही विरोध करत आहोत. रघुपती राघव राजाराम म्हणत निलेश लंके यांनी भाषण संपवलं.