Advertisement
धनंजय मुंडेंवर दमानियांनी केले गंभीर आरोप
मुंबई : काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंविरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरठे झिजवत होते असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि यांनी केला आहे. पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात पडून असल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. आपण असली कामं करत नसल्याचं त्यावेळी निक्षून सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचं दमानियांनी सांगितल आहे. जसं वाल्मिक कराड म्हणजं धनंजय मुंडे तसं राजेंद्र घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचं पंकजांनी सांगितल आहे. धनंजय मुंडेंनी त्यावेळी बहीण पंकजांविरोधात सुपारी देऊ केली होती असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. अंजली दमानियांच्या घरी आपण कधीच गेलो नसल्याचा दावा पोपट घनवट यांनी केला आहे. अंजली दमानियांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. धनंजय मुंडेंवर दमानियांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळं धनंजय आणि पंकजा या भाऊबहिणींच्या नात्यात पुन्हा कटूता येते की काय अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झाली आहे.