Advertisement
वक्फ विधेयकावर बोलताना इम्तियाज जलील यांचा संताप
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत मांडलेलं वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार तता एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच त्यांनी त्यांनी तिरुपती आणि शिर्डी मंदीर संस्थानाच्या मंडळावर आम्हाला घेणार का? असा परखड सवालही त्यांनी केला आहे.
सरकारने वक्फ बोर्डावर गैरमुस्लिमांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मग सरकार असंच करणार असेल तर तुम्ही इम्तियाज जलीलला सरकार शिर्डीच्या साईबाबा संस्थान मंदिराच्या बोर्डावर घेणार का? तिरुपती बालाजी येथील ट्रस्टवर मला घेणार का? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला.
मी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात होतो. मुस्लिम समाजाचा मुद्दा घेऊन वाद निर्माण झालेले मुद्दे संपले असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्फचा विषय घेऊन आले. हे विधेयक मुस्लीम समाजाला न्याय देण्यासाठी आणण्यात आले आहे, असे सांगितले जात आहे. वक्फ बोर्ड जो निर्णय घेत होता तो निर्णय घेण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे, असा आक्षेप त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाकडून आता आशा राहिली नाही. कारण तिथे प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे. तेथील न्यायाधीश सेवानिवृत्त झाल्यावर मोदींकडे जाऊन बसतात, असी घणाघाती टाकाही त्यांनी केली.