Advertisement
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : केवळ इलेस्ट्रिक बाईकला परवानगी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. राज्यात ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याचा महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कमी खर्चा जास्त प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ इलेस्ट्रिक बाईकला यामध्ये परवानगी असणार आहे. पट्रोल बाईक्सना यामध्ये परवानगी दिली जाणार नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राध्यान दिलं जाणार, असं देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
ई-बाईक धोरण महाराष्ट्रात स्वीकारलं जाणार आहे. यामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली बनवली आहे. पावसात भिजू नयेत अशा ई बाईक आणल्या जातील. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे. प्रवास दर अद्याप निश्चित केलेला नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 10 हजार अनुदान द्यायचा प्रयत्न करत आहोत. दहा हजारांहून अधिक रोजगार मुंबईतच निर्मिती होतील. तर महाराष्ट्रात 20 हजार रोजगार निर्माण होतील, अशा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.