Advertisement
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे प्रतिपादन
मंगळवेढा : रानात, फिरलेली आणि दमलेली मेंढी जसं रान खेकरतं तशीच परिस्थिती प्रश्नाबाबत झाल्याने जनतेला खेकरून गप बसावे लागत आहे. म्हणून प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी मोर्चे व निवेदनाने वाचा फोडूया, असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या मंगळवेढ्यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, मतदारसंघ अध्यक्ष संतोष रंदवे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, काँग्रेस शहराध्यक्ष ॲड राहुल घुले, फिरोज मुलाणी,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, दत्तात्रय भोसले, नारायण गोवे, साहेबराव पवार, जमीर इनामदार, स्मिता अवघडे, नितीन पाटील, गुलाब थोरबोले, अजय अदाटे, बळवंत पाटील, पंकज चव्हाण, काशीनाथ सावंजी आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, तालुक्यात २८ रस्त्यांचे कामे थांबविण्यात आली आहेत ती कामे का थांबवले म्हणून अधिकार्याला जाब विचारण्याची गरज आहे. भविष्यात या तालुक्यात शेतकरी, सर्वसामान्य, नागरिक यांना त्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाचे राजकारण करण्यासाठी प्रसंगी दामाजीपंता सारखे अधिकाऱ्यांना हात जोडून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडव, अशी विनंती करू, सध्या ७० महामंडळाचे कामकाज बंद झाले, शिक्षकाचे पगार थांबले आहे. यावरून सरकारला महामंडळाच्या माध्यमातून जनतेची काळजी होती की, या महामंडळात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची काळजी होती याचा विचार करण्याची वेळ आली. यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादीचे राहुल शहा, अनिल सावंत, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रा. येताळा भगत, राहुल घुले, फिरोज मुलाणी यांची भाषणे झाली.