Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात औरंजेबच्या नावावरुन आणि कबरीवरुन मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबची कबर हटवण्याचीही मागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. संभाजीनगरचे नाव औरंगाबाद असे होते. महाराष्ट्र सरकारने हे नाव बदलून संभाजीनगर असे केले. पण, संपूर्ण भारतात औरंगजेबच्या नावाने 177 गावे आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्रातील गावांचा आकडा जाणून धक्का बसेल.
औरंगजेब महाराष्ट्रात घुसला. दौलताबादचे नाव बदलून त्याने औरंगाबाद असे केले. भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं औरंगजेबने राज्य केलं. या दरम्यान त्याने फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील अनेक राज्यांमधील शेकडो गावांची नावे बदलून आपल्या नावावरुन गावांचे नामांतर केले.
औरंगजेबाच्या नावावर सर्वाधिक गावे आणि शहरे उत्तर प्रदेश राज्यात आहेत. उत्तर प्रदेशात औरंगजेबाच्या नावावर ६३ ठिकाणे आहेत. संपूर्ण देशात 177 गावे आणि शहरे औरंगजेबाच्या नावावर आहेत . या सर्वांमध्ये, सर्वात प्रसिद्ध शहर म्हणजे महाराष्ट्रातील औरंगाबाद, ज्याचे नाव आता बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. संपूर्ण देशात अशी 63 प्रसिद्ध ठिकाणे आहेत जी मुघल शासक औरंगजेबाच्या नावावर आहेत.
महाराष्ट्रातील औरंगाबाद, औरंगपुरा नावाची 35 ठिकाणे, औरंगनगर नावाची 3, औरंगगान नावाची 17, औरंगजेबपूर नावाची 13, औरंगजेबपूर नावाची 7 आणि औरंगबेहर नावाची 1 अशी ठिकाणे आहेत. देशभरात जवळपास 38 गावे औरंगजेबाच्या नावावर आहेत. औरंगजेबाच्या नावावर असलेल्या गावांच्या संख्येत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बिहारमध्येही औरंगजेबाच्या नावावर 12 गावे आहेत. एकूण आकडेवारी पाहिली असता. औरंगजेबाच्या नावावर उत्तर प्रदेश 63 ठिकाणे, महाराष्ट्र 26, बिहार मध्ये 13, हरियाणात 7, मध्य प्रदेशात 7, आंध्र प्रदेशात 4, उत्तराखंडमध्ये 3 तर, पश्चिम बंगाल आणि राजस्थान प्रत्येकी एक शहर आहे.