Advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरण
मुंबई : सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करुन यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. आरोपी दोन क्रमांक वर विष्णू चाटे याच नाव आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाले. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचा आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख आहे. आरोप पत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू चाटे याचा उल्लेख आहे.
आरोपत्रातील आरोपींची क्रमवारी
आरोपी क्रमांक एक- वाल्मीक कराड
आरोपी क्रमांक दोन- विष्णू चाटे
आरोपी क्रमांक तीन- सुदर्शन घुले
आरोपी क्रमांक चार- प्रतीक घुले\
आरोपी क्रमांक पाच- सुधीर सांगळे
आरोपी क्रमांक सहा- महेश केदार