Advertisement
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणात बबन गित्ते याचे कनेक्शन समोर आले आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी असलेला बबन गित्ते गेल्या 9 महिन्यांपासून फरार आहे. मारहाणीच्या प्रकरणानंतर बबन गित्ते त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. बबन गित्ते याच्या या पोस्टनंतर बीडमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.
मारहाणीनंतर आरोपीची फेसबुक पोस्ट
जुन्या रागातून बबन गित्ते याचा सहकारी असलेल्या महादेव गित्ते याने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांना मारहाण झाल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत ऊर्फ बबन गित्ते याची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत ऊर्फ बबन गित्ते याने फेसबुक पोस्ट करुन सरळ इशारा दिला आहे. वाल्मीक कराडवर झालेल्या हल्ल्यानंतर शशिकांत ऊर्फ बबन गीते याच्या पोस्टमधून वाल्मिक कराड याला इशारा दिला आहे.