Advertisement
मुंबई : स्टँडअप कॉमे़डियन कुणाल कामराने आपल्याला गद्दार असा उल्लेख केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे. तसंच जर आपल्याला कोर्टाने सांगितलं तरच माफी मागणार असल्याची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली नीच दर्जाचा विनोद आणि उपमुख्यमंत्र्यांचा अनादर केला जाऊ शकत नाही असं ते म्हणाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी फोनवरुन कुणाल कामराची चौकशी केली. कुणाल कामराने आपण तामिळनाडूत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्याने विरोधकांनी आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप फेटाळून लावला. खात्री कऱण्यासाठी कुणाल कामराने आपली खाती तपासण्याची परवानगीही दिली आहे. दरम्यान याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकही आमने-सामने आले आहेत. सत्ताधाऱी आमदारांनी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली आहे. तर विरोधकांनी कुणाल कामराची बाजू घेतली आहे.