Advertisement
मरवडे फेस्टिवलच्या रौप्यमहोत्सवी वर्षीनिमित्त विशेष सन्मान
मंगळवेढा : सोलापूर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेत शब्दप्रभू तथा माजी मंत्री डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांना मरवडे फेस्टीव्हलमध्ये समाज गाैरव पुरस्काराने सन्माानित करण्यात आले.
मंगळवेढा येथे १९९५ पासून छत्रपती परिवार मरवडे नगरीमध्ये युवा चळवळीच्या रुपाने कार्यरत आहे. मागील तीन दशकांत छत्रपती परिवाराने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, ग्रामविकास व प्रबोधन कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभारले आहे. याच छत्रपती परिवाराकडून मरवडे फेस्टिव्हल या सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, असे संस्थापक अध्यक्ष सुरेश दाजी पवार यांनी सांगितले. याच व्यासपीठावर मंगळवेढा तालुक्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही निवडक मंडळींचा गौरव करण्यात आला, त्यामध्ये सर्वात प्रतिष्ठेच्या समाज गाैरव पुरस्काराने माजी मंत्री तथा शाहू शिक्षण संस्था, पंढरपूरचे डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. ढोबळे यांनी आपल्या राजकीय जीवनात कार्यरत असताना आपल्या मतदार संघासाठी विकासाची गंगा आणली. यातून मंगळवेढा तालुक्याचे रूपडे बदलेले आहे, मंगळवेढा तालुक्याच्या विकासाची पायाभरणी डॉ. ढोबळे यांनी केली आहे, याचीच दखल घेत त्यांना समाज गाैरव पुरस्काराने गाैरविण्यात आल्याचे सुरेश दाजी पवार यांनी सांगितले. यावेळी ढोबळे यांचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.