Advertisement
बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. बीड जेलमध्ये दोघांना कैद्यांकडून मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महादेव गित्ते, अक्षय आठवलेने मारहाण केल्याचं समजते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले हे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान, याच कारागृहात बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले देखील आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड हा सध्या बीड जिल्हा कारागरामध्ये नऊ नंबरच्या बराक मध्ये आहे.त्याचबरोबर हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी ही याच जिल्हा कारागरामध्ये असून त्याच कारागृहामध्ये आहेत. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते देखील या जिल्हा करागरामध्ये आहे. आरोपी वाल्मीक कराड आणि महादेव गीते यांचे जुनेच वाद असल्याचे समोर येत आहे. दरम्यान ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.
बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन टोळ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर वाद झाला आणि वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येतंय. हा वाद कशामुळे घडला? याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर ?
वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याची माहिती समोर येत आहे. वाल्मिक कराडकडे एका नामांकित कंपनीचं आयकार्ड होतं. सोशल मीडियावर त्याचं हे आयकार्ड व्हायरल झाल आहे या आयकार्डमध्ये तो फिल्म प्रोडक्शन कंपनीचा आजीव सभासद असल्याची नोंद आहे. बीकेसीमध्ये कराडचं ऑफिस असल्याचा दावाही निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.