#

Advertisement

Friday, March 21, 2025, March 21, 2025 WIB
Last Updated 2025-03-21T11:40:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा मात्र अडगळीत

Advertisement

मंत्र्यांची दालनं मात्र चकचकीत 
मुंबई : विधानभवनातील दालनं आणि गॅलरी चकाचक होत असतानाच दुसरीकडे मात्र तेथील ग्रंथालयात असणारे दुर्मिळ ग्रंथ अडगळीत पडले आहेत. विधान भवनातील विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांची दालने कोट्यवधी खर्च करून चकाचक केली जात असताना विधान भवनाची ग्रंथसंपदा मात्र उघड्यावर पडली आहे. दालनांच्या बाहेरचा भाग चकाचक करण्यात आला असताना ग्रंथालयातील अनेक पुस्तकं अंधारात आहेत. उघड्यावर पडलेल्या या ग्रंथालयात 100 वर्षांहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आलेली ग्रंथसंपदा आहे. इथं विधानभवनाच्या डागडुजीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 586 कोटी रुपयांच्या घरात आहे. 
विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनासाठी विधानमंडळ चकाचक करण्यात आलं. महायुतीच्या पहिल्या काळात असलेल्या दालनांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अधिवेशन काळात हे काम थांबवण्यात आलं मात्र काही दालनांच सुशोभीकरण पूर्ण झालं. दालनांच्या बाहेर झगमगणारे दिवे, आलिशान खुर्च्या, उंची फर्निचर अशी फेररचना करण्यात आली. या दुरवस्थेत विधानभवनाचा अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झालं आहे.
ग्रंथालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या कपाटाच्या रकान्यात जुने वर्तमानपत्रांचे गठ्ठे धूळ खात पडल्याचं इथं स्पष्टपणे पाहायला मिळालं. शेकडो संर्दभग्रंथ सहाव्या मजल्यावरील उद्वाहनाजवळ एकमेकांवर रचून ठेवण्यात आले असून पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील या ग्रंथांच्या स्कॅनिंगचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

ब्रिटीशकालीन ग्रंथ
विधानभवनात धुळखात पडलेल्या या ग्रंथांमध्ये अनेक वर्षांपूर्वीचे ग्रंथ ब्रिटीशकालीन ग्रंथ, विधानपरिषद विधानसभेचा इतिहास, विविध कायद्यांची पुस्तकं, 1930 पासूनच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांचे परिचय, 1950 नंतरच्या चर्चा, लोकसभा आणि राज्यसभेची कागदपत्र, सामाजिक विषयांवरील 75 हजारांहून अधिक ग्रंथसंपदा यांचा समावेश आहे.