#

Advertisement

Monday, March 3, 2025, March 03, 2025 WIB
Last Updated 2025-03-03T11:16:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव

Advertisement

करुणा शर्मांना देण्यास सांगितला दोन लाखांची देखभाल खर्च

मुंबई : वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना दोन लाखांचा देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव  घेतली आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना जी दोन लाखांची देखभाल खर्च देण्यास सांगितली आहे त्यातील 1 लाख 25 हजार उदरनिर्वाहासाठी आहेत. तर 75 हजार मुलीचं लग्न होईपर्यंत तिच्या देखभालीसाठी आहेत. मुलगा सज्ञान असल्याने त्याला कोणतेही पैसे मिळणार नाहीत. मात्र करुणा शर्मा या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
करुणा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, दोन लाख रुपये देखभालीसाठी जे मागितले आहेत, ते देखील त्यांना द्यायचे नाहीत. वाल्मिक कराडकडे साडेचार हजार कोटींची प्रॉपर्टी निघाली आहे. पण स्वत:ची बायको, जी मुंडे घराण्याच्या उत्तराधिकाऱ्याची जी आई आहे, 1.25 लाख आणि मुलीला 75 हजार देण्याचा आदेश आहे. पण त्यांनी सत्र न्यायालयात याचिका केली असून, अनेक दावे केले आहेत. कोर्टात 21 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यावेळी मला माझी कमाई, कंपनी यासंदर्भात सांगायचं आहे. माझा पक्ष आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यासाठी फक्त 10 हजार लागतात. फक्त 10 हजारांचा डीडी लागतो. माझ्याकडे कंपनी आहे असंही त्यांनी सांगितलं. पण कंपनी सात वर्षांपासून बंद पडली असून, एक रुपयाही मिळत नाही. हे सर्व मी न्यायाधीशांसमोर मांडणार आहे. तिथेही ते तोंडावर पडणार आहेl आणि तिथूनही देखभाल खर्च देण्याचा आदेश मिळेल. 

किमान मला महिन्याला 15 लाख हवे आहेत.  न्यायाधीशांनी आम्हाला 2 लाख देण्यास सांगितलं आहे. रक्कम वाढवण्यासाठी मी अर्ज करणार आहे. 2 लाखांची घराचा हफ्ता आणि 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलीचं लग्न जवळ आलं आहे. 2 लाखात आम्ही काय करणार आहोत?