Advertisement
केज : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील सुनावणीसाठी आज सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्जवल निकम केज येथील जिल्हा व अतिरिक्त सेशन्स कोर्टामध्ये उपस्थित होते. अॅडव्हकेट उज्जवल निकम यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. उज्जवल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.
खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम आज उज्जवल निकम यांनी सांगितला. कशापद्धतीने खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग होता हे सांगण्याबरोबरच खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम उज्जवल निकम यांनी कोर्टाला सांगितला. वाल्मिक कराडने खंडणी जगमित्र कार्यालयात मागीतल्याचं सरकारी वकीलांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे का? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली? का असा सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला. यावर सरकारी वकिलांनी, वाल्मिकी कराडच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत. आवाज ओळखण्यात आला आहे. 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं. विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व आरोपी हजर होते, असा जोरदार युक्तिवाद उज्जवल निकम यांनी केला.