Advertisement
मुंबई : महानगर पालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तरी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आगामी 4 मेला सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना बाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मे महिन्यात निकाल लागला तरी देखील महानगर पालिका पावसाळ्याअगोदर होणार नाहीत, असंच दिसतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे. कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी वेळ लागणार असल्याची माहिती आहे.