दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात म्हणजेच पीएमओमध्ये एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती विषयक मंत्रिमंडळ समितीने या नियुक्तीला मान्यता दिली. यापूर्वी निधी तिवारी पीएमओमध्ये उपसचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांना परराष्ट्र मंत्रालयात (MEA) काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.
Advertisement
निधी तिवारींकडील जबाबदारी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सचिव म्हणून निधी तिवारी आता दैनंदिन प्रशासकीय काम पाहतील. पंतप्रधानांच्या बैठका परदेश दौऱ्यांची तयारी आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या पदावर असताना त्यांना पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय साधावा लागेल. महत्त्वाच्या बैठका आयोजित कराव्या लागतील आणि विविध सरकारी विभागांशी समन्वय साधावा लागेल.
पगार किती ?
माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे वेतनमान वेतन मॅट्रिक्स स्तर 14 नुसार निश्चित केले जाते. या स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यास दरमहा 1 लाख 44 हजार 200 रुपये इतका पगार दिला जातो. यासोबतच महागाई भत्ता (DA), घर भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि इतर भत्ते देखील दिले जातात.