#

Advertisement

Monday, March 24, 2025, March 24, 2025 WIB
Last Updated 2025-03-24T11:26:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रशांत कोरटकरला अखेर अटक

Advertisement

तेलंगणातून ठोकल्या बेड्या 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलंगणामधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कोल्हापूर पोलीस लवकरच याबाबत माहिती देण्याची शक्यता आहेत. न्यायालयाने प्रशांत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला होता.
प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी ठेवली आहे.  तोपर्यंत न्यायालयाने अटकेपासून संरक्षणही दिलं नव्हतं. त्यामुळे प्रशांत कोरटकर हा परदेशी पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्यानंतर कोलकाता विमानतळावरुन तो दुबईला पळून गेल्याचा संशय होता.