Advertisement
मोहोळ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यालयात दोरीवर पुस्तके टांगून तरंगते वाचनालय उपक्रम घेण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन शाळेतील सहशिक्षिका उर्मिला भिसे यांनी केले होते. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक रामेश्वर भोसले यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता पाचवीतील सर्व विद्याथ्यांनी सहभाग घेतला. हा आगळावेगळा उपक्रम केल्यामुळे मुलांच्या मनामध्ये वाचनाविषयी आवड निर्माण झाली. पुस्तक हा आपला मित्र आहे. मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या विळख्यातून मुलांना पुस्तकाची गोडी निर्माण करणे. सोशल मीडियाचा होणारा अतिवापर टाळणे, ग्रंथ हेच आपले गुरु आहेत, याची जाणीव मुलांना करून देणे हा या मागचा उद्देश ठेऊन सदर उपक्रम घेण्यात आला. या वेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर नाईकनवरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षक प्रमोद कोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.