Advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मास्टर प्लान
दिल्ली : कैलास-मानसरोवरचे दर्शन व्हावे अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा असते. पण कैलास मानसरोवरला जाण्यासाठी नेपाळ-चीनची सीमापार करुन जावे लागते. पण आता भारतीयांना कैलास मानसरोवरची यात्रा करणे आता सोप्पे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. उत्तराखंडच्या पिढोरगड ते नेपाळ-चीन सीमा जोडणाऱ्या रस्त्याचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.
उत्तराखंडच्या पिथौरगढ ते कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करण्यासाठी आता नेपाळ किंवा चीनला जाण्याची गरज भासणार नाही. पिथौरगढपासून कैलास मानसरोवरला जाण्यासाठी नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या नवीन प्रकल्पामुळं भारतीय नागरिक नेपाळ किंवा चीनला न जाता कैलास मानसरोवरची यात्रा करू शकतो. नवीन प्रकल्पामुळं यात्रेचा वेळ आणि प्रवासाचा त्रास देखील वाचणार आहे. तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाला हवामानाच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. उणे 8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जात असताना अशा परिस्थितीत काम करणे खूप कठीण आहे. या परिस्थितीत वर्षातून फक्त तीन ते चार महिने काम सुरू ठेवू शकतो, असं गडकरी यांनी स्पष्ट केले.