Advertisement
मंगरूळ येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
मंगरूळ : पंढरपूर येथील शाहू शिक्षण संस्था संचलीत मंगरूळ येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी चंदा चमके.., या गीतावर सुंदर केलेल्या नृत्यास कंचेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने प्रथम क्रमांकाचे पारितोषीक देण्यात आले. कंचेश्वर यात्रा महोत्सव मंगरूळ निमित्त संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी कलागुण प्रदर्शन केले.
कंचेश्वर यात्रेचे मान चिन्ह आणि ५१०० रूपये बक्षीस यात्रा कमिटीचे अध्यक्ष व तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर क्षीरसागर व शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हे पारितोषिक स्विकारले. शाळेच्या या यशबद्दल शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तसेच संचालिका अड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंगरूळचे बीट अंमलदार राऊत. शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.