#

Advertisement

Thursday, February 20, 2025, February 20, 2025 WIB
Last Updated 2025-02-20T11:18:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार

Advertisement

सलग दोन मिनिटही बोलता येत नसल्याची माहिती 

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला आहे. या आजाराच्या रुग्णांना दोन मिनिटंही बोलता येत नाही. अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे.
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही.
त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही. याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.