#

Advertisement

Wednesday, February 26, 2025, February 26, 2025 WIB
Last Updated 2025-02-26T11:26:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संतोष देशमुख हत्या प्रकरण; उज्वल निकम यांची नेमणूक

Advertisement

मुंबई :  बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. 
धनंजय देशमुख हे मस्साजोगच्या ग्रामस्थांसह अन्न त्याग आंदोलनाला बसले आहे. आजचा त्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 78 जिवस पूर्ण होऊन न्याय मिळाला नाही. या न्यायासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनातील एक मागणी सरकारने मान्य केली आहे.
उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली ही समाधानाची बाब, मात्र आंदोलन केल्या नंतरच सरकार मागण्या मान्य करतय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे. उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर धनंजय देशमुख यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे.