#

Advertisement

Thursday, February 20, 2025, February 20, 2025 WIB
Last Updated 2025-02-20T11:04:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कारावास

Advertisement

नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली  दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड 

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आणि विरोधकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. 
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. 29 वर्षांनंतर नाशिक जिल्हा न्यायालयाने या केसचा निकाल दिला आहे. यात माणिकराव कोकाटे व बंधु सुनील कोकाटे हे आरोपी नंबर 3 व 4 होते. कोकाटे यांनी सदनिका मिळवताना स्वतःला आर्थिक दुर्लभ घटक दाखवले होते. मात्र त्याच वेळी त्यांचे वडील कोपरगाव साखर कारखण्यात संचालक होते व जानकारांनुसार ते 100-200 टन उस कारखान्यात पाठवत होते.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर 1995 मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये कलम 420 , कलम 465 , कलम 471 आणि कलम 474  या कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
शहराच्या मध्यभागत बॉइज टाऊन शाळेजवळ एका इमारतीमध्ये एकूण  सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे मिळवल्या होत्या. नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता. या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते.