#

Advertisement

Tuesday, February 25, 2025, February 25, 2025 WIB
Last Updated 2025-02-25T15:26:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्राजक्ता माळीच्या नृत्य कार्यक्रमाला विरोध

Advertisement

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला आता विरोध होताना दिसत आहे. मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. यापूर्वी सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं ललिता शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे. तसेच या पत्रामध्ये ललिता यांनी प्राजक्ता माळी वादग्रस्त व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या नृत्याविष्कारा कार्यक्रमाला विरोध असल्याचंही म्हटलं आहे. या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी असल्याचं पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असंही ललिता यांनी म्हटलं आहे.  

कोणी आयोजित केला आहे कार्यक्रम?
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्र्वस्तांच्या वतीने प्राजक्ता माळीच्या नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.  महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता माळी यांचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आता त्याच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्याने हा कार्यक्रम उद्या म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी होणार की तो विरोध गृहित धरता रद्द केला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.