Advertisement
नीलम गोऱ्हेंना 4 टर्म आमदारकी मिळाली, त्यांनी 2 मर्सिडीज...
दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असं वक्तव्य करून त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही गोऱ्हेंच्या आरोपावर भाष्य केल आहे. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही पण ते योग्य झाले नाही, त्यांनी केलेले विधान हे अयोग्य आहे, असे शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.