#

Advertisement

Wednesday, February 26, 2025, February 26, 2025 WIB
Last Updated 2025-02-26T11:32:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर

Advertisement

महाराष्ट्र शासनाकडून यावर्षीपासून दिला जाणार 

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणारा पहिला 'महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कारा'ची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.
ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात. त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम  व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभुषण' हा ग्रंथ लिहिला होता. तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले होते. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.