Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा आहे. मध्यरात्री एक तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही भेट मध्यरात्री नाही तर रात्रीच्या वेळेस झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी (एसपी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली पण ही भेट मध्यरात्री नाही तर रात्री 7.50 मिनिटांनी झाल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच या भेटीत काय चर्चा झाली याचा खुलासा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. साधारण आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय बंगल्यावर भेटीसाठी गेलो असे जयंत पाटील यांनी सांगितले. 25 मिनिटे भेट झाली.भेटीनंतर आपण स्वतः पाटील यांना निवासस्थानाबाहेर सोडल्याचा खुलासा बावनकुळे यांनी केला आहे. ही भेट राजकीय नसून सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्न, सातबारा, सांगलीकरणावर चर्चा झाली. जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कामासाठी भेट झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मतदार संघातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.