Advertisement
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे. सरकारने 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा कृती कार्यक्रम जाहीर करताच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी सरकारच्या या कृती कार्यक्रमावर वॉच ठेवण्यासाठी एक टास्क फोर्सच तयार केली आहे. पक्षातील आमदार आणि खासदारांना विभानिहाय जबाबदारी देऊन सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार हे येत्या काळात राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने हंड्रेड डेज ट्रॅकिंग टास्क फोर्स तयार केली आहे. सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी पवार गटाने शॅडो कॅबिनेट तयार केली आहे. राज्यभरात या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शरद पवार यांनी सर्वांना विभागवार महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. पक्षसंघटनावाढीसाठी शरद पवार पक्षाचा नवा अजेंडा राबवताना दिसत आहे. पवार यांनी पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीनं कामाला लागा, असे आदेशही दिले आहेत.
पवार गटाची टास्कफोर्स
- मराठवाडा- राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर
- विदर्भ- राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख
- कोकण- जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा
- पश्चिम महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे
- उत्तर महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील