#

Advertisement

Wednesday, February 26, 2025, February 26, 2025 WIB
Last Updated 2025-02-26T11:09:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार

Advertisement


स्वारगेट स्थानकात थांबलेली असतानाची घटना 

पुणे : स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये  नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना आज पहाटे ५.३० ते ६.०० च्या सुमारास  रात्रीच घडल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार आरोपीचा शोध सुरूआहे.
स्वारगेट परिसरात नेहमी बऱ्यापैकी वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येतंय. रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. मात्र, या प्रकारामुळं पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासदेखील पोलिस करत आहेत.