Advertisement
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र कॅबिनेटचा निर्णय लीक झाल्यामुळेच हा प्रस्ताव मांडता आला नाही असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित आर आर पाटील आक्रमक झाले आहेत. डान्सबार पुन्हा सुरू केले तर मैदानात उतरू, असा इशारा रोहित आर.आर.पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने 2016 साली डान्सबारसंदर्भात एक कायदा केला होता. डान्स बारसंदर्भात नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट 2016 हा नवा कायदा केला होता. या कायद्यात आता काही नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत.