#

Advertisement

Monday, February 24, 2025, February 24, 2025 WIB
Last Updated 2025-02-24T11:18:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आता प्रयागराजला येणं बंद करा...

Advertisement

स्थानिकांची भक्तांना विनवणी 
प्रयागराज : महाकुंभ मेळ्यासाठी भक्तांती अद्यापही गर्दी होत असून, आता मात्र स्थानिक या गर्दीला वैतागले आहेत. त्यांनी आता जाहीरपणे महाकुंभसाठी येणाऱ्या भक्तांना प्रयागराजला येऊ नका असं सांगण्यास सुरुवात केली आहे. याचं कारण भक्तांच्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत असून, सर्व व्यवस्था बिघडली आहे.भक्त, पर्यटकांची इतकी गर्दी असल्याने स्थानिकांना दैनंदिन आयुष्यात अनेक अडचणींची सामना करावा लागत आहे. 
एका स्थानिकाने Reddit ला व्हिडीओ शेअर केला असून युजरने गेल्या वर्षभरात महाकुंभच्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे शहरात नवे रस्ते, फ्लायओव्हर्स आणि चांगली वाहतूक व्यवस्था निर्माम करण्यात आली याबद्दल सांगितलं आहे. पण आता इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची उत्सुकता पूर्णपणे थकव्यामध्ये बदलला आहे. महाकुंभ संपण्याच्या अखेरच्या टप्प्यात आपण पोहोचलो आहोत. मग आता ही गर्दी कमी होण्याऐवजी वाढू का लागली आहे? असं स्थानिक सांगत आहे. 
युजरने भक्तांना आपले दौरे पुढे ढकला अशी विनंती केली आहे. कृपयाच्या देवाच्या प्रेमाखातर येणं थांबवा. गंगाजी आणि संगम कुठे जात नाही आहेत. तुम्ही नंतर शांतपणे येथे येऊ शकता. शहरावर आणि येथील लोकांवर थोडी कृपा करा. आम्ही भीक मागत आहोत, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.