Advertisement
शरद पवारांच्या खासदारांना फोन; खळबळजनक दावा
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क सोनिया दुहान यांच्याकडून संपर्क साधण्यात आल्याचं खासदार अमर काळे यांनी म्हटलं आहे. विरोधात बसून काय करणार आमच्यासोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे म्हणाले आहेत. याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचंही अमर काळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही कधीही आमदार पळवले नाहीत, फोडले नाहीत असं ते म्हणाले आहेत.
सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क साधण्यात आला आहे. विरोधात काय करणार आमच्या पक्षात या अशी चर्चा आमच्या खासदारांना सोबत केली आहे. सुप्रिया सुळे यांना मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती, असं अमर काळे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले आहेत की, "आमदार लोकशाहीच्या माध्यमातून अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेने विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केलं. माझ्या सार्वजनिक, राजकीय आयुष्यात बाप-लेक असा शब्दप्रयोग मी कधी केला नाही. पण अशी ओंगाळवाणा शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. त्यांच्या तोंडून ती वाक्यं नेहमीच येत असतात.