Advertisement
मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं भाष्य
मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केलं आहे. मी राजीनामा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. मी ना आरोपी आहे किंवा माझा काही संबध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा यापद्धतीने मागणी केली जात आहे.
मुंडे यांनी सांगितलं की, वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. छोटा आका, मोठा आका अशी भाषा पहिल्यांदाच मी ऐकत आहे. एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी अतिशय व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुखची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणं हा आमचा पहिला उद्धेश आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही.
मुळात या प्रकरणी ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी सर्वात आधी अधिवेशनात केली होती. त्यामुळे लगेचच चार्जशीट दाखल करुन, अटक करावी आणि फास्ट ट्रॅकमध्ये मारेकऱ्यांना हत्येची शिक्षा मिळावी," असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात काही चर्चा केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. ती घटना अतिशय दर्दवी आहे, जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी अशी आपली भूमिका स्पष्ट केली. जे निर्णय अजित पवार घेतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले.