#

Advertisement

Tuesday, January 7, 2025, January 07, 2025 WIB
Last Updated 2025-01-07T13:33:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनंजय मुंडेंची नवीन अडचण; करुणा मुंडे हायकोर्टात

Advertisement

औरंगाबाद :  धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधीच बीड प्रकरणामुळं धनंजय मुंडे अडचणीत असताना करुणा शर्मा यांच्या या याचिकेमुळं धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात असल्याची चर्चा आहे. 
धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी करुणा मुंडे  यांचा फॉर्म 30-10-2024 ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता. त्याविरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झाली ती करप्ट प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आम्ही करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटीशन दाखल केली आहे, असं करुणा मुंडे यांच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून, तिचा कुठे उल्लेख केलेला नाही. तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडून झालेली दोन मुलं, त्याचा उल्लेख केलेला आहे.  त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा कुठे उल्लेख केला नाही. ही सगळी माहिती त्यांनी दडवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठली माहिती लपवून ठेवली तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते.  त्याला पुराव्याची गरज नाही. कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडे आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.