#

Advertisement

Thursday, January 2, 2025, January 02, 2025 WIB
Last Updated 2025-01-02T15:07:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

छगन भुजबळांसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार ?

Advertisement

नागपूर : छगन भुजबळांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिंडळातून राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. धनंजय मुंडेंची बीड प्रकरणात विकेट काढली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटल आहे. या दाव्याने सध्या राजकारणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडवून दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, असं असताना आता छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचं अजित पवारांच्या मनात आहे, असा दावा काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी  केला आहे. यासाठी धनंजय मुंडेंची विकेट काढून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात इन करण्याचा डाव आहे का ? असा संशय विरोधकांकडून व्यक्त होत आहे. धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतरही अजित पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याचा अर्थ काय असा सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.राजकारणात कोणी तरी आऊट झाला तर कोणतरी इन होत असतो असं म्हणतात. पण भुजबळांना इन करण्यासाठी मुंडेंना आऊट करण्याची कुणाची रणनिती असेल तर मुंडेंच्या भविष्यातल्या राजकारणासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.