Advertisement
प्रारुप मतदार यादी नव्याने करण्याचे आदेश
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या आहेत. बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती अर्ज विक्री व स्वीकृतीचा पहिल्या दिवसानंतर ही प्रक्रिया करण्यात आली होती. |
31 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवा अध्यादेश काढून या सूचना केल्या आहेत त्यामध्ये, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी दि.०१.०६.२०२४ अखेरच्या दिनांकास धरुन केलेली असल्याने, सदर मतदार यादीस दि.०२.१२.२०२४ रोजी ०६ महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचा दि.०१ जानेवारी, २०२५ पासून आहे त्या टप्यावर सुरु होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करुन नव्याने प्रारुप मतदार यादी तयार करुन सुधारीत निवडणूक कार्यक्रम राबविण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे.