Advertisement
मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतक-यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतक-यांना परत करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतक-यांना फायदा होणार आहे.
राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या 4 हजार 949 जमिनी शासन दरबारी जमा आहेत. शेतसारा न भरल्यामुळे या जमिनी तहसीलदार यांनी शासन जमा केल्या होत्या. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी संपूर्ण 963 शेतकऱ्यांच्या जमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडी रेकनर दराच्या 25 टक्के इतका रक्कम भरून ही जमिन पुन्हा नावावर केली जातील. अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.