Advertisement
सोलापूर : तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गाभा-याच्या संवर्धनाच्या वेळी गाभा-यातील चार शिळांना तडे गेल्याचं महंत तुकोजी बुवा यांनी निदर्शनास आणून दिली.. तडे गेलेल्या या शिळांचे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार असून रडारद्वारे त्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर प्रशासन शिळा बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं पुरातत्व विभागानं सांगीतल.
स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. तुळजा या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती असून मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन आणि पुरोहिताचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.