#

Advertisement

Friday, January 3, 2025, January 03, 2025 WIB
Last Updated 2025-01-03T11:38:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिका आणि समाजाचे नेतृत्व करा

Advertisement

भारतीय प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्रीमुक्तीच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त प्रथम त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! 

सावित्रीबाईंनी शिक्षणातून जीवनाची मुळाक्षरे सांगण्याकरिता महात्मा फुलेंच्या चळवळीला मनापासून साथ दिली. भिडे वाड्यात शिक्षणाची पाहिली घंटा वाजवली आणि त्या माउलीच्या वैचारिक सावलीत लेकीबाळीचे शिक्षण घडले. स्त्रियांच्या आयुष्याला प्रगतीची दिशा मिळाली. तत्कालीन समाज व्यवस्थेने पिढ्यानपिढ्या चार भिंतींच्या आत कोंडून ठेवलेल्या स्त्रियांच्या पंखांना बळ दिलं. आज कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण, संशोधन, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ, सेनादल, हवाई दल, नेव्ही, पोलीस,.... अशा हरेक क्षेत्रात महिला स्वकर्तृत्वानं उंच भरारी घेत आहेत, ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच!

सध्या आपल्या तिन्ही संरक्षण दलात भरती होण्याचे सत्र सुरु आहे. युवकांनी सैन्य दलात भरती व्हावे म्हणून शासन आवाहन करत आहे.  शिक्षणाचा विचार समाजात रुजावा, यासाठी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी प्रबोधन यात्रा काढल्या. राज्यातल्या ३६ जिल्ह्यात मुक्काम करून शिक्षणाचे, प्रबोधन यात्रेचे महत्व आणि स्वरूप समजून सांगितले. 

“जिगरबाज तरुण मित्रांनी अण्णाभाऊंच्या फकिराचे नाव घेऊन नाचण्यापेक्षा लष्कराला आव्हान देणारा फकिरा होऊन सैन्यात भरती झालं पाहिजे. आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा आणि देशाचा लौकिक वाढविला पाहिजे. देशात्यागाची गोंडा लावलेली टोपी डोक्यावर घालून रुबाबात गावात येताना गावानं आणि समाजानं तुमचं जंगी स्वागत केलं पाहिजे, असा संकल्प करून सैन्यात भारती व्हा. 

समाज अडाणी असल्यामुळे गटार काढत गेला. सावकाराची घरं राखत राहिला. पाटील, देशमुखांचे पाय धरले. त्यामुळं ५९ जातींमध्ये आपण मागे राहिलो. पुढारलेल्या चर्मकार आणि महार समाजाचे अनुकरण केले असते, सवलत कळली असती तर आपली पोरं लंडन, अमेरिकेला शिकायला गेली असती. सत्तेत वावरणाऱ्या पुढाऱ्यांना देखील शिक्षणाचे भान राहिले नाही, त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले, असे सैन्यात भरती होण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेबांनी केलं होतं. त्यामुळेच महार बटालियन अस्तित्वात आली आणि समाजाला संघर्षाची ओळख झाली. आपण वाडा राखून, गटार काढून, पाया पडो संस्कृती वाढवत राहिलो, त्यामुळं समाजाचे नुकसान झाले. 
आता शिक्षणाचे महत्व समजले आहे, पण परिस्थितीमुळे समाज अर्धवट शिकला आहे. त्याला लष्करात जाण्यापुरती शिक्षणाची गरज आहे. म्हणून एक तिथं अर्धी भाकरी खा, पण शिक्षण घ्या. सैन्यात भरती व्हा आणि सेवानिवृत्त झाल्यावर समाजाचे नेतृत्व करा. हीच खरी सावित्रीमाईंना जयंतीदिनी आदरांजली ठरेल.

प्रा. लक्ष्मण ढोबळे (माजी मंत्री)
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार