Advertisement
धाराशिव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांत झालेल्या हाणामारीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यातील वाशीतील बावी या गावात शेताला पाणी देण्यावरुन वाद झाला होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गट हाणामारीवर उतरले की यात 4 जणांचा मृत्यू झाला. यात 3 पुरुष एक महिला मृत्युमुखी पडले आहेत. तर, या घटनेत लहान मुलंदेखील जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मध्यरात्रीच्या ही घटना घडली असून शेतात पाणी देण्यावरुन वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात येरमळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 आरोपींना संशियत म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, एका क्षुल्लक कारणावरुन झालेला वाद इतका विकोपाला गेला की 4 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनेच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.