#

Advertisement

Friday, January 3, 2025, January 03, 2025 WIB
Last Updated 2025-01-03T11:48:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेक

Advertisement

सोलापूर :  मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. अचानकपणे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोणीतरी हुल्लडबाजी करत, कोणी गर्दुल्ल्याने दगडफेक केली का? की अन्य कोणते कारण आहे  याचा शोध आता रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.