Advertisement
महाराष्ट्रातील 10 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
मुंबई : राज्याचे वातावरण तापले आहे. यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारलेला नाही. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शनमोडवर आले आहेत. कॅबनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीतील मंत्र्यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. यासह प्रशासकीय पातळीवर देखील मोठ्या हालचाली झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 10 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार बदली झालेले अधिकारी
1) जयश्री भोज यांची महाआइटी येथून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
2) साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
3) विनिता वेद सिंघल, प्रधान सचिव, कामगार यांची प्रधान सचिव, पर्यावरण, म्हणून नियुक्ती झाली आहे.
4) आय.ए. कुंदन, एसीएस स्कूल एज्यु. प्रधान सचिव, कामगार म्हणून नियुक्ती
5) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव, वने आणि महसूल
6) वेणुगोपाल रेड्डी, एसीएस फॉरेस्ट, एसीएस, हायर आणि टेक.एड्यु.
7) निपुण विनायक, रुसा सचिव, पब हेल्थ
8) संतोष पाटील, सीईओ जि.प. पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा
9) हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय
10) विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण. प्रधान सचिव, कृषी म्हणून नियुक्ती.