#

Advertisement

Friday, January 3, 2025, January 03, 2025 WIB
Last Updated 2025-01-03T13:08:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुमच्यासमोर ओरडत बसू का?

Advertisement

चाकण : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली. त्यानंतर भुजबळ हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आज  पुण्याच्या चाकणमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं.
मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे, यावर आता पुन्हा एकदा भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  मी जो काही निर्णय घेतला असेल तो मी तुम्हाला सांगेल का? मी रोज नाराजी नाराजी करून तुमच्यासमोर ओरडत बसू का?  मला काय घाई नाही, मी निर्णय घेतला आहे, माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर सांगेल असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर आले. यावर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.  चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं आहे. पवार साहेब देखील त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.