#

Advertisement

Thursday, January 2, 2025, January 02, 2025 WIB
Last Updated 2025-01-02T14:39:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा बंदुकीसाठी कारनामा

Advertisement

बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट 

धाराशीव : तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आलाय. आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा करणाऱ्या सरपंच निकम प्रकरणात पोलिस तपासात एक नवी गोष्ट समोर आली आहे. राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण बरंच गाजत आहे. इतक्यात काही दिवसांपूर्वी मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरही हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्याचही पवनचक्की कनेक्शन असल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर पोलिसांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेत तपासाची चक्र फिरवली. मात्र, तपासातून जे समोर आलं त्याने पोलिसच चक्रावून गेले. कारण बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी सरपंच नामदेव निकम यांनीच स्वत: वर हल्ल्याचा बनाव रचल्याच तपासात समोर आल आहे. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.