Advertisement
प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे- ढोबळे यांनी केले अभिनदंन
मोहोळ : स्त्रीला संधी मिळाल्यास ती कोणत्याही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखविते, याचे स्पष्ट उदाहरण म्हणून मोहोळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षिका उर्मिला अविनाश भिसे यांचे नाव सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे. कारण, त्यांना "माता सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2024" कुर्डवाडी तालुक्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघाकडून जाहीर झाला आहे. तसेच, उर्मिला भिसे यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड शिक्षण विभाग व सोलापूर भारत स्काउट गाईड यांनी बाळे येथे चंडक प्रशालेत आयोजित केलेले सात दिवसाचे निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याने "उत्कृष्ट गाईड कॅप्टन" (बेसिक) पुरस्कारानेही सोलापूर जिल्हा आयुक्त कादर शेख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अशा प्रकारे सन्मानित होण्याचा मान प्रथमच एका महिलेने मिळविला असल्याचे सांगतिले जात आहे. उर्मिला भिसे यांच्या या यशाबद्दल शाहू शिक्षण संस्था तसेच बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे- ढोबळे यांनी अभिनदंन केले आहे.