Advertisement
मुंबई : शरदचंद्र पवार साहेब... ही फक्त एक व्यक्ती नाही तर इतिहास घडविणारा विचार आहे. राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालून सहा दशकांहून जास्त काळ त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले. आजही ते वयाच्या ८५व्या वर्षी त्याच जोमाने काम करतात. काळ त्यांच्या पावलांना रोखू शकला नाही. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा... किनारा तुला पामराला, याप्रमाणे हा माणूस हार न मानता प्रत्येकवेळी उसळी घेऊन आव्हान पेलण्याचे सामर्थ्य दाखवतो. म्हणूनच हा नेता तरुणांचे ऊर्जास्रोत बनला आहे, अशी भावना व्यक्त करीत आज, नवीन वर्षानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब तसेच अजयजी साळुंखे सर यांनी पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.