#

Advertisement

Thursday, December 5, 2024, December 05, 2024 WIB
Last Updated 2024-12-05T12:18:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मविआच्या बड्या नेत्यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

Advertisement

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारनं प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे  नेते देखील शपथविधीला हजर नाहीत.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. 
कोण आहेत अभिजीत पाटील? 
अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं काम करण्याचा निर्णय घेतला होता.  लोकसभेनंतर ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले आणि माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले.