#

Advertisement

Thursday, December 19, 2024, December 19, 2024 WIB
Last Updated 2024-12-19T12:10:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

काहींना वाटतं आजन्म मंत्री असाव : आमदार पाटील

Advertisement

नाशिक :  छगन भुजबळ यांची नाराजी हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काहींना असं वाटतं  वाटतंय की मी आजन्म मंत्री असावा मग नवीन येणाऱ्यांनी काय करायचं? यामुळे नवीन येणाऱ्या आमदारांनी सत्ता घ्यायची नाही का?” असा सवाल मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
आजचा कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता होईल हे जे म्हटलं जातं हे खोटं आहे का? त्यामुळे नवीन लोकांना देखील संधी देऊन त्यांचे व्हिजन त्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, यावर काम झाले पाहिजे. ही सर्व समाजाची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना काय वाटतं हे मला माहित नाही. प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावे. मग नवीन येणाऱ्यांनी काय करायचं, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

ओबीसींचा कैवारी ?
दरम्यान छगन भुजबळ यांनी काल नाशिकच्या मेळाव्यात त्यांची पुढील रणनिती जाहीर केली. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसींचा कैवार घेत राज्यात आंदोलन करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी समतेचे चक्र उलट दिशेने नेणाऱ्यांनाच आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.