Advertisement
रुपाली ठोंबरे यांच्याकडून शेअर
पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी शनिवारी मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला. या मोर्चात सहभागी होण्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा त्यांनी X च्या माध्यमातून केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया…या कॅप्शनने स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.